कराड (सातारा) - काळाबाजार करणाऱ्या वहागाव येथील रेशनिंग दुकानदाराचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे - देवकाते यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे. याबाबतचा आदेश कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनाही पाठविला आहे. वहागाव येथील स्वस्त धान्य दुकानदार गौतम ताटे हा धान्य वितरणानंतर शासन नियमानुसार ग्राहकांना कसलीही पावती देत नव्हता.
काळाबाजार भोवला, कराडमधील रेशनिंग दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द - कराडमधील रेशनिंग दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द
दुकानाबाहेर धान्यसाठा दर्शक फलक, ग्राहक यादी लावत नव्हता. दुकानदाराने त्याच्याकडील पावती पुस्तक शासनाकडे सादर केले नव्हते. तसेच साठा बुक आणि विक्री रजिस्टरमध्ये खाडाखोड केली होती. त्याठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याची सही नव्हती. या गोष्टी तपासणीवेळी आढळून आल्या.
![काळाबाजार भोवला, कराडमधील रेशनिंग दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द कराडमधील रेशनिंग दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6772832-823-6772832-1586764591406.jpg)
दुकानाबाहेर धान्यसाठा दर्शक फलक, ग्राहक यादी लावत नव्हता. दुकानदाराने त्याच्याकडील पावती पुस्तक शासनाकडे सादर केले नव्हते. तसेच साठा बुक आणि विक्री रजिस्टरमध्ये खाडाखोड केली होती. त्याठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याची सही नव्हती. या गोष्टी तपासणीवेळी आढळून आल्या. याशिवाय दुकानाची वेळ व सुट्टीचा दिवस याबाबत कसलीही माहिती ग्रामस्थांना देण्यात येत नव्हती.
ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीचा ठराव बहुमताने मंजूर केला होता. प्रशासनाने केलेल्या तपासणीतही ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच दुकानदार काळ्याबाजाराने धान्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली. कोरोनासारख्या संकटकाळातही दुकानदार परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे आढळून आले. यामुळे धान्य दुकानदार गौतम ताटे याच्या रेशनिंग दुकान परवान्याची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करुन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे