नवी दिल्ली -केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर साताऱ्यातील निवडणूकीची कार्यक्रमपत्रीका जाहीर केली आहे.
हेही वाचा... साताऱ्यात राष्ट्रवादी सोडणारा कधी खासदार होत नाही - जयंत पाटील
21 ऑक्टोबरला मतदान, 24 तारखेला मतमोजणी
राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेली सातारा लोकसभा पोटनिवडणूक अखेर जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे.
हेही वाचा... राष्ट्रवादी उदयनराजेंचा पोटनिवडणुकीत दारुण पराभव करेल - नवाब मलिक
खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे या ठिकाणी रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.