महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; अपघातातून प्रवासी थोडक्यात बचावले

दुपारी वाई आगाराची वाठारहून वाईला जाणारी एसटी पिंपोडे बुद्रुक येथे बसस्थानकानजीक आल्यानंतर चालक अशोक फरांदे (रा. ओझर्डे) यांना छातीत तीव्र वेदना आल्या. भोवळ आल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला.

bus accident
बस अपघात

By

Published : Nov 18, 2020, 10:35 PM IST

सातारा -कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशनहून वाईला जाणारी एस. टी. बस पिंपोडे बुद्रुक येथे बसस्थानकानजिक आली असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने एसटी चालक व सर्व प्रवासी अपघातातून बचावले आहेत.

कशी घडली घटना?

दुपारी वाई आगाराची वाठारहून वाईला जाणारी एसटी पिंपोडे बुद्रुक येथे बसस्थानकानजीक आल्यानंतर चालक अशोक फरांदे (रा. ओझर्डे) यांना छातीत तीव्र वेदना आल्या. भोवळ आल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी विरुध्द दिशेला जात बसने रस्त्यावरील दुचाकीला धडक दिली. त्यानंतर रस्त्यापासून सुमारे ३० फूट लांब असणाऱ्या दुकानासमोर पार्क केलेल्या गाडीला जोरदार धडक देऊन एसटी थांबली. या ठिकाणी गाडी नसती, तर एसटी दुकानात घुसली असती. यामुळे मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा -शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातून एसटीची सेवा सुरू करा; नागरिकांची मागणी

यामध्ये एसटी चालक फरांदे किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने सर्व प्रवाशी अपघातातून बचावले. फरांदे यांना प्राथमिक उपचारासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तर एसटी बसने ठोकरल्याने गाडीचे प्रचंड नुकसान झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details