सातारा - कोरेगाव तालुक्यातील वाघोलीच्या भारत विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या बसला परत येताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका हद्दीत पहाटे अपघात झाला आहे. या अपघातात सुरेश रामचंद्र यादव (वय ४२), उमेश गोपाळराव देशमुख (वय ५५), हनुमंत गोरोबा माने (वय ३५) या शिक्षकांसह आर्यन अमोल गंगावणे (वय १४), आसिफ इम्तियाज पठाण (वय १३) आणि आर्या किशोर भोईटे (वय १३) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत.
भारत विद्या मंदिरची बस : कोकणात सहलीसाठी गेलेल्या कोरेगाव तालुक्यातील वाघोलीच्या भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बसला परत येताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका हद्दीत पहाटे अपघात झाला आहे. बसने कंटेनला पाठीमागून धडक दिल्याने बसमधील तीन शिक्षक आणि तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. पाच जणांवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात तर एका मुलीवर सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
शिक्षकांसह तीन विद्यार्थी जखमी : पहाटे झालेल्या अपघातात एसटी बसमधील एकूण सहा जण जखमी झाले आहेत. सुरेश रामचंद्र यादव (वय ४२), उमेश गोपाळराव देशमुख (वय ५५), हनुमंत गोरोबा माने (वय ३५) या शिक्षकांसह आर्यन अमोल गंगावणे (वय १४), आसिफ इम्तियाज पठाण (वय १३) आणि आर्या किशोर भोईटे (वय १३) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये तर आर्या किशोर भोईटे या विद्यार्थिनीला सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कंटेनरला पाठीमागून धडक : भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची वार्षिक सहल रत्नागिरीला गेली होती. सहलीवरून परत येत असताना पहाटेच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसटी बसने (क्र. एम. एच. १४ एच. जी. ८४९२) कंटेनरला (क्र. एच. आर. ६७ बी. २६१७) पाठीमागून धडक दिली. सातारा-पुणे लेनवर हा अपघात झाला. या अपघातात बसमधील तीन शिक्षक आणि तीन विद्यार्थी जखमी झाले. महामार्ग रूग्णवाहिकेतून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा - Satara Accident : धक्कादायक! ट्रक- दुचाकी अपघात; नातू जागीच ठार तर आजी-आजोबा जखमी