सातारा - सातार्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छतेचे आणि उत्खननाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान एका अवजड लोखंडी पेटीचा भाग सापडला आहे. तसेच एक लोखंडी ट्रंकही मिळून आला आहे. पुरातत्व विभागाने लोखंडी पेटी व इतर अवशेष रविवारी ताब्यात घेतले आहेत. मात्र, ही पेटी किल्ल्यावर कोणी व का नेली असावी? याचं गूढ अद्याप कायम आहे. त्यामुळे आता इतिहास अभ्यासक आणि पूरातत्व विभागाकडून या पेटीच्या वापराचा शोध लावला जात आहे.
अजिंक्यताऱ्यावर उत्खननामध्ये सापडली आणखी एक पेटी, लोखंडी पेटीचे गुढ कायम - लोखंडी ट्रंक अजिंक्यतारा किल्ला
साताऱ्याचा अजिंक्यतारा हा इतिसाची साक्ष देणारा गडेकोट, स्वराज्याच्या राजधानीचा मान या किल्ल्यालाही मिळाला आहे. मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणून अजिंक्यतारा गडाची ओळख. गेल्याच आठवड्यात गडावर स्वच्छतेचे काम सुरू असताना राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेच्या स्वयंसेवकांना जुना दगडी चौथरा व सुमारे एक टन वजनाची लोखंडी पेटी सापडली होती.
![अजिंक्यताऱ्यावर उत्खननामध्ये सापडली आणखी एक पेटी, लोखंडी पेटीचे गुढ कायम अजिंक्यताऱ्यावर उत्खननामध्ये सापडली आणखी एक पेटी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12502027-thumbnail-3x2-a.jpg)
अजिंक्यताऱ्यावर उत्खननामध्ये सापडली आणखी एक पेटी
ऐतिहासिक वाड्याच्या समोरच आढळून आलेल्या दगडी चौथऱ्याजवळील मातीच्या ढिगाऱ्यात जुन्या इमारतीचे अवशेष आढळून आले आहेत. त्याच ढिगार्यात लोखंडी पेटीचा दरवाजा व काही भाग मिळून आला. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक लोखंडी ट्रॅकही सापडला आहे. या ऐतिहासिक वस्तुचा वापर नेमका त्या काळात कशासाठी केला जात होता. ती मराठा कालखंडातील आहे की ब्रिटीश या संदर्भात आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचाच शोध आता इतिहास अभ्यासक घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
लोखंडी पेटीचे गुढ कायम
Last Updated : Jul 19, 2021, 9:02 AM IST