महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Brinda Karat on PM Modi : नरेंद्र मोदींची बुलडोजर नीती देशाच्या एकात्मतेला घातक - वृंदा करात यांची टीका - पंतप्रधान मोदी धोरणे वृंदा करात प्रतिक्रिया

महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक ( Brinda Karat on PM Modi policies in Satara ) सुविधांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणाकडे लक्ष देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सार्वजनिक व्यवस्था उद्ध्वस्त करणारी बुलडोजर नीती देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोकादायक आहे, अशी टीका माजी खासदार वृंदा करात ( Brinda Karat news Satara ) यांनी केली.

Brinda Karat comment on pm modi policies
पंतप्रधान मोदी धोरणे वृंदा करात प्रतिक्रिया

By

Published : Jun 4, 2022, 12:07 PM IST

कराड (सातारा) - महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक ( Brinda Karat on PM Modi policies in Satara ) सुविधांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणाकडे लक्ष देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सार्वजनिक व्यवस्था उद्ध्वस्त करणारी बुलडोजर नीती देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोकादायक आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरो सदस्या तथा माजी खासदार वृंदा करात ( Brinda Karat news Satara ) यांनी सातार्‍यातील पत्रकार परिषदेत केली.

माहिती देताना माजी खासदार

हेही वाचा -सातारा बसस्थानकात शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून वृद्धा जागीच ठार

भाजपकडून व्यक्तीपुजेचे अवडंबर -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरच्या व्यापक कार्यक्रमात व्यस्त आहे. मात्र, भाजपने व्यक्तिपूजेचे अवडंबर माजवत देशात वाढलेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे वृंदा करात म्हणाल्या. गेल्या आठ वर्षांत भांडवलशाही अर्थव्यवस्था प्रबळ झाली असून, देशातील 61 टक्के जनतेचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपयांच्या आत राहिले आहे. तब्बल सहा कोटी तरुणांना रोजगार गमवावा लागला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. तरीसुद्धा प्रत्येक प्रार्थना स्थळामागे शिवपिंड शोधण्याचा भाजपचा उद्योग म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा घातक पायंडा म्हणावा लागेल. नरेंद्र मोदींची ही बुलडोजर नीती असून यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत असल्याचा आरोप वृंदा करात यांनी केला.

धार्मिक ध्रुवीकरण धोकादायक -जातनिहाय जनगणना मोदी सरकारकडून केली जात नाही. सामाजिक समतेची दरी वेगवेगळ्या स्तरांच्या माध्यमातून किती रुंदावली आहे, याचे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणून चुकीचे अजेंडे जाणीवपूर्वक राबवले जात आहेत. आरएसएस आणि भाजपने सुरू केलेले राजकीय आणि धार्मिक ध्रुवीकरण हे अर्थिक, सामाजिक आणि राजकीय रचनेच्या दृष्टीने धोकादायक आहे. या विरोधात सर्वसामान्यांनी धाडसाने पुढे येण्याचे आवाहन वृंदा करात यांनी केले.

हेही वाचा -कोयना धरणाच्या पाणी वाटप कराराच्या तांत्रिक वर्षाचा आज शेवटचा दिवस! २० टीएमसी पाणीसाठा शिल्लक

ABOUT THE AUTHOR

...view details