सातारा- लॉकडाऊनमुळे वाहनांची चाके थांबली आहेत. त्यामुळे, अनेक लोक आपल्या गावी जाण्यासाठी पायपीट करत आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून रोजच अनेक लोक पायपीट करत जाताना दिसत आहेत. अशात दररोज सुमारे अडीचशे cकरून कराड तालुक्यातील वाठार गावच्या नवतरूण युवक गणेश मंडळाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
सामाजिक बांधिलकी, वाठारमधील युवकांकडून गरजूंना अन्नदान - नवतरूण युवक गणेश मंडळ
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून रोजच अनेक लोक पायपीट करत जाताना दिसत आहेत. अशात दररोज सुमारे अडीचशे लोकांच्या जेवणाची सोय करून कराड तालुक्यातील वाठार गावच्या नवतरूण युवक गणेश मंडळाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
मंडळाच्या या उपक्रमाचे पोलीस, महसूल प्रशासनाने कौतुक केले. प्रगत आणि पुरोगामी विचार जोपासणारे गाव, असा लौकीक असणारे कराड तालुक्यातील वाठार गाव पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला वसले आहे. गावाच्या बाहेरूनच राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने महामार्गावर घडणार्या अपघातासारख्या घटनांवेळी गावातील युवक नेहमीच मदतीसाठी धावतात. सध्या कोरोनामुळे सगळीकडे संचारबंदी, जमावबंदी आहे. वाहने बंद आहेत. अशा परिस्थितीत कामासाठी आलेले परराज्यातील नागरिक, युवक पायपीट करत आपल्या गावी जात आहेत. महामार्गावर असे चित्र आता रोजच दिसत आहे.
संचारबंदीमुळे दुकाने, हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे, उपाशीपोटी रस्त्याने पायपीट करत निघालेले लोक पाहून वाठारमधील नवतरूण सार्वजनिक गणेश मंडळाने महामार्गाकडेलाच जेवण तयार केले. पादचारी मार्गावर लोकांची पंगत बसवून त्यांना जेवण दिले. एका दिवसात सुमारे अडीचशे लोकांच्या जेवणाची मंडळाने सोय केली. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दीघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, डीवायएसपी सूरज गुरव, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे उपस्थित होते. त्यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.