सातारा :माहेरी आलेल्या नवविवाहित प्रेयसीला स्वतःच्या घरी बोलावून धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या करून प्रेमवीरानेही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील वांझोळी गावात घडली आहे.
दोन दिवसांपूर्वी आली होती माहेरी :खटाव तालुक्यातील वांझोळी येथील या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, पण काही महिन्यांपूर्वीच नवविवाहित प्रेयसीचा शामगाव येथील एका तरूणाशी विवाह झाला होता. दोन महिन्यानंतर ती शनिवारी आपल्या माहेरी वांझोळीत आली होती. घरी बोलावून केला खून :वांझोळी गावात या दोघांचे घर काही अंतरावर आहे. तुझ्याशी काही बोलायचे आहे, असे सांगून प्रियकराने नवविवाहित प्रेयसीला आपल्या घरी बोलावून घेतले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत प्रियकराने नवविवाहित प्रेयसीचा खून केला. तिला वर्मी घाव बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यानेही घरातच आत्महत्या केली.
प्रियकराला प्रेयसीसोबत करायचे होते लग्न :दोघांचेही प्रेमसंबंध होते. प्रियकराला तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र, प्रेयसीचे लग्न शामगाव येथील तरुणाशी झाले. त्याचा राग प्रियकराच्या मनात होता. नवविवाहित प्रेयसी माहेरी वांझोळीला आल्याची संधी साधून प्रियकराने तिचा निर्घृणपणे खून केला.
खटाव तालुका हादरला :प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्या आणि आत्महत्येच्या घटनेमुळे खटाव तालुका हादरला आहे. लग्नानंतर दोन महिन्यातच नवविवाहितेचा खून झाल्यामुळे खटाव तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर घटनेची माहिती मिळताच पुसेसावळी आणि औंध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजी विठोबा माळी यांनी औंध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तपास करत आहेत.
हैदराबादमध्येही अशाच प्रकारची घटना घडली :नागरकुरनूल जिल्ह्यातील चारुकोंडा मंडलातील वंकराई तांडा येथे राहणारा नेनावत नवीन (२०) हा नालगोंडा येथील महात्मा गांधी विद्यापीठात बी.टेकच्या (ईईई) शेवटच्या वर्षाला शिकत आहे. पेरला हरिहरकृष्ण हा वारंगल जिल्ह्यातील करीमाबाद येथील रहिवासी आहेत. तो हैदराबादमधील पिरजादीगुडा येथील अरोरा कॉलेजमध्ये बी. टेकचे शिक्षण घेत आहे. दिलसुखनगर आयडियल कॉलेजमध्ये इंटरचे शिक्षण घेत असताना दोघांची मैत्री जमली.
यामुळे रचला हत्येचा कट:नवीनला एक गर्लफ्रेंड होती. हरिहरकृष्णाला हे माहीत होते. दोन वर्षांपूर्वी नवीन आणि त्या मुलीचे भांडण झाले होते. हे पाहून हरिहरकृष्ण प्रेमाच्या नावाने तिच्या जवळ गेला. यानंतर, नवीन त्याच्या पूर्व प्रेयसीशी फोनवर बोलत बोलत असल्याचे हरिहरकृष्णला कळले. यामुळे तो रागावला. आपल्या आवडत्या मुलीला मिळवण्यासाठी त्याने नवीनची हत्या करण्याचा कट रचला. याकरिती त्याने एक चाकूही विकत घेतला. तो नवीनला जीवे मारण्याच्या संधीची वाट पाहत होता. त्याने नवीनला फोन केला आणि महिन्याच्या १७ तारखेला मित्रांचे गेट-टूगेदर आहे असे सांगितले. यासाठी तो त्याला हैदराबादला घेऊन आला.
हेही वाचा :Family Found Dead in Kolkata : भयंकर! कोलकातामध्ये सापडले तीन कुजलेले मृतदेह, वाचा संपुर्ण घटना