महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातार्‍यात एकतर्फी प्रेमातून तरूणीची गळा चिरून हत्या, मारेकरी पोलीस ठाण्यात झाला हजर - एकतर्फी प्रेमातून भरदिवसा तरूणीची गळा चिरून हत्या करण्यात आली

सातार्‍यातील चाफळ (ता. पाटण) येथे एकतर्फी प्रेमातून भरदिवसा तरूणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या चाफळ गावात गुरूवारी भरदिवसा झालेल्या तरूणीच्या हत्येने पाटण तालुका हादरला आहे.

v
v

By

Published : Sep 24, 2021, 6:28 AM IST

कराड (सातारा) - सातार्‍यातील चाफळ (ता. पाटण) येथे एकतर्फी प्रेमातून भरदिवसा तरुणीचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. हत्येनंतर मारेकऱ्याने पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि.23) घडली आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय 18 वर्षे), असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. या प्रकरणी अनिकेत मोरे (वय 22 वर्षे) या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

तरूणीच्या हत्येने तीर्थक्षेत्र चाफळ हादरले

पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या चाफळ गावात गुरुवारी भरदिवसा झालेल्या तरूणीच्या खुनाने पाटण तालुका हादरला आहे. या घटनेची माहिती मिळताच कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील आणि मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. खून झालेली चैतन्या आणि संशयित अनिकेत हे दोघेही मुळचे कोरेगाव तालुक्यातील आहेत.

एकतर्फी प्रेमातून घडली घटना

चैतन्याची आई कामानिमित्त चाफळमध्येच राहतात. संशयित अनिकेत आणि चैतन्या हे दोघेही एकाच तालुक्यातील असल्याने त्यांची ओळख होती. अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेम होते. तसेच तो वारंवार तिला भेटायला होता. काही दिवसांपूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेवून चैतन्यासोबत लग्न करण्याची इच्छा अनिकेतने बोलून दाखवली होती. त्यानंतर गुरूवारी सकाळी अनिकेत मोटरसायकलवरून चाफळला आला. अनिकेतने तिचे तोंड दाबून चाकूने तिचा गळा चिरला. या हल्ल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेने तीर्थक्षेत्र चाफळनगरी हादरून गेली. भरदिवसा घडलेल्या थरारामुळे गावात खळबळ उडाली होती.

घटनेनंतर संशयिताने पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संशयितास तरूणीच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -महाबळेश्वरजवळ गुराख्यांना 'ब्लॅक पँथर'चे दर्शन, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details