महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा - केंजळगडावर ट्रेकिंग करताना मुलगा कोसळला खोल दरीत - सातारा केंजळगडावर ट्रेकिंग

केंजळगडावर पर्वतारोहण करण्यासाठी सासवड (ता.पुरंदर) परिसरातील सात ते आठ पर्यटक आले होते. मयांक उरणे हा वडिलांसोबत आला होता. केंजळगडावर सकाळी सात वाजता पर्वतारोहण यासाठी सुरुवात केली. साडेआठ ते नऊच्या दरम्यान पुढे जात असताना या चमूतील मयंक हा दोनशे फूट खोल कोसळून गंभीर जखमी झाला.

boy fell into valley in satara
केंजळगडावर ट्रेकिंग करताना मुलगा कोसळला खोल दरीत

By

Published : Jun 14, 2021, 1:20 AM IST

सातारा -वाईजवळ, केंजळगडावर चढाई करत असताना दहा वर्षांचा मुलगा पाय घसरून तो खोल दरीत कोसळला होता. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला वाईत प्राथमिक उपचारानंतर पुणे येथे हलविण्यात आले आहे.

२०० फुट दरीत सापडला गंभीर अवस्थेत -

मयंक उरणे (वय १०, रा. सासवड, पुणे) असे जखमी मुलाचे नाव आहे. केंजळगडावर पर्वतारोहण करण्यासाठी सासवड (ता.पुरंदर) परिसरातील सात ते आठ पर्यटक आले होते. मयांक उरणे हा वडिलांसोबत आला होता. केंजळगडावर सकाळी सात वाजता पर्वतारोहण यासाठी सुरुवात केली. साडेआठ ते नऊच्या दरम्यान पुढे जात असताना या चमूतील मयंक हा दोनशे फूट खोल कोसळला. ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतल्यानंतर तो गंभीर जखमी अवस्थेत सापडला. थंड हवा, पावसाची रिपरिप, वाढलेले गवत यामुळे किल्ल्याच्या पाऊल वाटेवर चिपचीप झाली आहे. यामुळे मयांकचा पाय घसरून तो खोल दरीत पडला होता.

ग्रामस्थांनी केली मदत -

ग्रामस्थांनी शोध घेऊन खोल दरीतून मयंकला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले. वाई येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर मुलाला पुढील उपचारासाठी पुणे दाखल केला आहे. ही माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय मोतेकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाखिरे वस्तीतील युवकांनी मुलाचा शोध घेऊन बाहेर काढल्याबद्दल व मदत कार्य केल्याबद्दल वाई तालुक्यातील नागरिकांनी वस्तीतील ग्रामस्थांचे आभार मानले.

हेही वाचा - उपचार केंद्रांकडून लूट थांबवण्यासाठी तपास यंत्रणा असावी, नागरिकांची अपेक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details