सातारा - जिल्ह्याच्या सातारा तालुक्यातील पाडळी येथे चोरून सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. नितीन देशमुख (वय ३०), कुलदीप ढाणे (वय ३८), उद्धव खवळे (वय ३७), रोहित वरक (वय २०) सर्व राहणार पाडळी, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सातारा : पाडळी येथे जुगार अड्ड्यावर छापा, ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - Gambling news in satara
पाडळी येथील मातंगवस्तीत, लक्ष्मीआई मंदिरासमोर जुगार खेळणाऱ्या ४ जणांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
पाडळी येथील मातंगवस्तीत, लक्ष्मीआई मंदिरासमोर काही जण पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता काही लोक मोकळ्या शेडमध्ये दोन-दोन जणांचे ग्रुप करून जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी छापा टाकत नितीन देशमुख, कुलदीप ढाणे, उद्धव खवळे, रोहित वरक यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून ५ हजार ६०० रुपये, ३ मोबाइल हँडसेट, पत्याची पाने असा एकूण ३६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, विजय साळुंखे, विशाल जाधव यांनी केली.