सातारा -खटाव तालुक्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बोगस कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे ( BJP district president and MLA Jayakumar Gore ) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने ( High court rejects pre arrest bail application ) आज (मंगळवारी) फेटाळला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी गोरे यांना न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली असून तोपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
बोगस कागदपत्रांद्वारे फसवणूक :खटाव तालुक्यातील मायणी येथील मृत पिराजी भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुट्रगडे (रा. विरळी ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) आणि अज्ञात दोघांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून गोरेंसह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. वडूज सत्र न्यायालयाने गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.