महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्याच्या बोधेवाडी घाटात जळालेल्या वाहनासह आढळला मृतदेह - Satara Crime News

कोरेगाव आणि खटाव तालुक्याला जोडणाऱ्या बोधेवाडी घाटमध्ये सोमवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आणि चारचाकी गाडी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळली. या प्रकरणी वाठार पोलीस अधीक तपास करत आहेत.

bodie-and-vehicle-of-deceased-were-found-in-bodhwadi-ghat-of-satara
साताऱ्याच्या बोधेवाडी घाटात जळालेल्या वाहनासह आढळला मृतदेह

By

Published : Jan 22, 2020, 1:04 PM IST

सातारा -कोरेगाव आणि खटाव तालुक्याला जोडणाऱ्या बोधेवाडी (पिराचा) घाटामध्ये सोमवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीकडून सुरेश मोरे (वय - ३२) या वर्षीय तरुणाची हत्या झाली. हत्येनंतर त्याचा मृतदेह आणि त्याची चार चाकी गाडी पेटवून देण्यात आली. अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. मोरे याच्या डोक्यावर सत्तुरासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुना देखील आहेत. मुंबईतील रिअल इस्टेट व्यवसायातूनच त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सुमित मोरे हा मूळचा महिमानगड (ता. माण) येथील रहिवासी असून, त्यांचे सर्व कुटुंबीय मुंबईत स्थायिक आहेत. महिमानगड येथील वडिलार्जित जमिनीची विक्री करण्याचा निर्णय मोरे कुटुंबियांनी घेतला होता. त्यामुळे तो गेले काही दिवस स्वत:ची मारुती सेलेरिओ कार (क्र. एम. एच. ०१-बी-बी-७१०५) घेऊन गावी आला होता. उर्किडे गावचे पोलीस पाटील असलेले मामा जितेंद्र श्रीरंग कांबळे यांची भेट त्याने १६ जानेवारीला घेतली होती.

सोमवारी दिवसभर तो वडिलार्जित जमिनीची कागदपत्रे जमा करण्यात मग्न होता. दहिवडीत त्याने ठाण मांडला होता. सायंकाळी काम उरकल्यानंतर मुंबईला निघण्याच्या तयारीत तो होता. त्याने रात्री भावाला फोन करुन जेवण करुन मुंबईला निघतो, असे सांगितले देखील होते. रात्री २ च्या सुमारास त्याने भावाला फोन करुन कोणी तरी माझा पाठलाग करत आहे. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन मी तक्रार देतो, असे तो म्हणाला होता. मात्र, झोपेचा अंमल असल्याने भावाने फोन ठेवला. त्याने विषय फार गांभीर्याने घेतला नाही. तो झोपी गेला.

वाठार स्टेशन-दहिवडी रस्त्यावरील बोधेवाडी (पिराचा) घाटामध्ये सकाळी रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत कार उभी असल्याचे व जवळचा एका व्यक्तीचा अर्धवट अवस्थेत मृतदेह पडला असल्याची माहिती या मार्गावरुन प्रवास करणार्‍या विशाल चव्हाण याने नागेवाडीचे पोलीस पाटील संतोष चव्हाण यांना दिली. त्यांनी तातडीने वाठार पोलीस ठाण्यात माहिती दिली. सुमित मोरे याच्या डोक्यात सत्तुरा सारख्या धारदार शस्त्राने वार केला गेला असून, त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. चार चाकीत बसून, त्याच्यावर हल्ला करण्यात आला. तो मृत झाल्यानंतर गाडीतून बाहेर काढून पेट्रोलच्या सहाय्याने पेटवून दिला. अर्धवट जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह रस्त्याकडेच्या नाल्यात टाकून देण्यात आला होता. विशेष म्हणजे हत्या करणार्‍यांनी चार चाकी गाडीची नंबरप्लेट काढून गाडीत ठेवली होती. घटनास्थळी पेट्रोलचा कॅन व बाटली देखील पोलिसांना आढळली आहे.

वाठारा पोलीस ठाणे - दहिवडी रस्त्यावरील बोधेवाडी (पिराचा) घाटमध्ये सकाळी रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत कार उभी असल्याचे आणि जवळच एक व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडला असल्याचे विशाल चव्हाण यांना दिसले. त्यांनी नागेवाडीचे पोलीस पाटील संतोष चव्हाण यांनी याची माहिती दिली. यानंतर पोलीस पाटलांनी वाठार पोलीस ठाण्यात माहिती दिली. सुमित मोरे हा मुंबईहून दहिवडीकडे येऊन -जाऊन असल्याने तो मारुती सेलेरिओ कारचा वापर करत होता. काही दिवसांपूर्वी गावी आल्यानंतर त्याने सातार्‍यात कार पार्क केली होती. त्यामुळे या हत्तेमागे महिमानगड येथील वडिलार्जित जमीन विक्री प्रकरण, सातारा कार पार्क प्रकरण अथवा मुंबईतील रिअल इस्टेटमधील व्यवहारांचा काही संबंध आहे, का याची पडताळणी पोलीस करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details