सातारा-वाई विधानसभा मतदारसंघाचे भाजप युतीचे अधिकृत उमेदवार किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी शुक्रवारी रॅली काढत विधानसभेचा अर्ज दाखल केला. यावेळी वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यातील भाजप शिनसेनेचे हजारो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील झाले होते.
साताऱ्याच्या वाई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे जोरदार प्रदर्शन - madandada bhosle
या मतदारसंघात पाटील यांचे वर्चस्व आहे. तर मदनदादा भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणुकी वेळी काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केला आहे.
![साताऱ्याच्या वाई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे जोरदार प्रदर्शन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4654910-844-4654910-1570230077404.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे जोरदार प्रदर्शन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे जोरदार प्रदर्शन
हेही वाचा -विधानसभा की लोकसभा पोटनिवडणूक? दोन दिवसात निर्णय - पृथ्वीराज चव्हाण
दरम्यान, ही लढत आमदार मकरंद पाटील विरुद्ध मदनदादा भोसले अशी होणार आहे. या मतदारसंघात पाटील यांचे वर्चस्व आहे. तर मदनदादा भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणुकी वेळी काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केला आहे.