सातारा - भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल (बुधवारी) साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळीच त्यांना अधिक तपासण्यांसाठी मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रक्तदाब वाढल्याने त्यांना त्रास झाल्याचे नजीकच्या सूत्रांनी सांगितले.
भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची प्रकृती बिघडली.. मुंबईला हलविले - BJP MLA Shivinder Singh Sinhaj Bhosale
भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल (बुधवारी) साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळीच त्यांना अधिक तपासण्यांसाठी मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रक्तदाब वाढल्याने त्यांना त्रास झाल्याचे नजीकच्या सूत्रांनी सांगितले.
भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांनी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात त्यांना भरती केले. परंतू रात्री उशिरापर्यंत शिवेंद्रसिंहराजे प्रेमी कार्यकर्त्यांची रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी होती. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही मध्यरात्री रुग्णालयात येऊन शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली.
हेही वाचा -VIDEO : 'होता जिवा म्हणून वाचला शिवा', शिवजयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्याच्या शिलेदाराचे विनम्र स्मरण!
दरम्यान, सकाळी अधिक तपासण्यांसाठी शिवेंद्रसिंहराजे यांना मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमुळे दगदग झाल्याने त्यांना त्रास झाला असावा. तरी काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे शिवेंद्रसिंहराजे यांच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले.