सांगली- भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवेशबंदीवरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीची ही तालिबानी वृत्ती चालू देणार नाही, तसेच किरीट सोमैया यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर राज्यातील आघाडी सरकार बरखास्त झालेले दिसेल, आणि दादागिरीचे उत्तर दादागिरीने दिले जाईल, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे, ते इस्लामपूर मध्ये बोलत होते.
तालिबानी वृत्ती चालु देणार नाही, दादागिरीला उत्तर दादागिरीने देऊ; सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीला इशारा - सदाभाऊ खोत यांची टीका
हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवाहाराचे आरोप केल्यानंतर कोल्हापुरात राष्ट्रवादीच्य कार्यकर्त्यांनी सोमैयांच्या कोल्हापूर दौऱ्याला आव्हान देत पायताणाने स्वागत करण्याचा इशारा दिला. तर कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोमैयांना कोल्हापुरात येण्यास रोखले आहे. तरीही कोल्हापूरला जाणाऱ्या सोमैयांना कराड पोलिांनी ताब्यात घेतले. या सर्व प्रकरणावर सरकारचीही तालिबानी वृत्ती चालु देणार नाही, दादागिरीला उत्तर दादागिरीने देऊ असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.
दादागिरीला उत्तर दादागिरीने देऊ; सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीला इशारा
Last Updated : Sep 20, 2021, 7:53 AM IST