महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सक्षम कारखाने अवमूल्यन करुन घशात घालणे ही पवार परिवाराची मोडस - किरीट सोमैया

महाराष्ट्रात साखर चळवळ पाॅवरफुल पवार परिवार कसे हाताळतात हे शिकायचे असेल तर बारामतीला जावेच लागेल. येत्या ५ (ऑक्टोंबर) तारखेला मी जरंडेश्वर कारखान्यासह बारामतीला अभ्यासासाठी जाणार आहे, अशी स्पष्टोक्ती भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

किरीट सोमैया
किरीट सोमैया

By

Published : Sep 28, 2021, 5:43 PM IST

सातारा -चांगले चाललेले साखर कारखाने अवमूल्यन करुन घशात घालायचे ही पाॅवरफुल पवार परिवाराची मोडस आहे. महाराष्ट्रात साखर चळवळ पाॅवरफुल पवार परिवार कसे हाताळतात हे शिकायचे असेल तर बारामतीला जावेच लागेल. येत्या ५ (ऑक्टोंबर) तारखेला मी जरंडेश्वर कारखान्यासह बारामतीला अभ्यासासाठी जाणार आहे, अशी स्पष्टोक्ती भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजपा नेते किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद

जरंडेश्वरचे शिष्टमंडळ भेटले

कोरेगावच्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाने किरीट सोमैया यांची मंगळवारी (आज) साताऱ्यात भेट घेतली. जरंडेश्वर कारखान्याची सर्व माहिती देऊन कारखान्याच्या माहितीची फाइल किरीट सोमैयांकडे सादर केली. कोल्हापूरला जाण्यापुर्वी सोमैया साताऱ्यात विश्रामगृहावर थांबले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

'५ कारखान्यांचा अहवाल अमित शहांना देणार'

उद्धव ठाकरे, शरद पवार यांना १०० कोटीचा मोह फार आहे. वसूली १०० कोटी, दावा १०० कोटीचा. १९ बंगल्यांसाठी उद्धव ठाकरे यांनी रविंद्र वाईकर करवी माझ्यावर १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा केला. उद्धव ठाकरे असो, रविंद्र पवार, हसन मुश्रीफ, अनिल परब असो हे सगळे शंभर नंबरी आहेत. मुंबई विद्यापीठात मी फायनान्स विषयातून पीएचडी केली आहे. पण माझ्यासाठी या पाॅवरफुल पवार परिवाराने शिकण्यासाठी एक वेगळा विषय दिला आहे. अनेक कारखान्यांमध्ये यांची मोडस ऑपरेंडसी सारखी आहे. हसन मुश्रीफ, अजित पवार असो नाही तर पारनेर असो, राष्ट्रवादीच्या नेत्याने एखादा कारखाना घ्यायचा. तो कितीही सक्षम असला तरी कारखान्याचे प्रचंड अवमूल्यन करण्यात आले. पाॅवरफुल पवार परिवाराने दोन-चार चांगले व्हाॅल्युअर, फायनान्सियल एक्सपर्ट यांनी मिळून एक डिझाइन तयार केली. एका एका नेत्याने कारखाने वाटून घेतले. म्हणून मी आता या कारखान्य‍ांमध्ये लक्ष घातले आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी अनागोंदी आहे. त्यामुळे सहकार चळवळ बदनाम होत आहे. म्हणून राज्यातील ५ सहकारी साखर कारखान्यांचा अभ्यास करुन सविस्तर अहवाल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना सुपूर्त करणार आहे, असे यावेळी सोमैया म्हणाले.

'५ तारखेला 'जरंडेश्वर'वर जाणार'

मी येत्या ५ तारखेला जरंडेश्वर कारखान्यासह बारामतीला अभ्यासासाठी जाणार आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणे हा आपला अजेंडा असून त्याची सुरुवात आता केली आहे. आपल्याला कोणी कितीही अडवले तर आपण थांबणार नाही, असेही किरीट सोमैया यांनी स्पष्ट केले. ईडीला सामोरे गेलो तर सर्व घोटाळे बाहेर येतील, याची खात्री असल्याने अनिल परब यांच्यात ईडीपुढे येण्याची हिंम्मत नाही. ते ईडीपुढे येणार नाहीत, असेही सोमैया म्हणाले. यावेळी भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, विकास गोसावी, प्रवीण शहाणे उपस्थित होते. सोमैया साताऱ्यात येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा -मुलींची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही चुकीचं केलं नाही, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार - अनिल परब

ABOUT THE AUTHOR

...view details