महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवार, ठाकरेंनी बंदी घालून दाखवावी; किरीट सोमय्यांचे चॅलेंज - Kirit Somaiya challenge to Sharad Pawar

भाजप नेते किरीट सोमय्या आज मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची तक्रार देण्यासाठी कोल्हापुरातील मुरगूड पोलीस ठाण्यात जाणार आहेत. दरम्यान, त्यांनी अंबाबाईचं दर्शनही घेतलं. यावेळी पवार, ठाकरेंनी मला बंदी घालून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. कारण, यापूर्वी त्यांना कराडमधूनच माघारी पाठवण्यात आले होते.

kirit
kirit

By

Published : Sep 28, 2021, 1:23 PM IST

कराड (सातारा) : 'अंबामाता ही शक्तीची माता आहे. अंबेमातेने राक्षसाचा वध केला होता. त्याप्रमाणे घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा नाश करण्याची मला शक्ती द्यावी, अशी मी प्रार्थना अंबेमातेला करणार आहे', असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुरगूड पोलीस ठाण्यात ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्यांची तक्रार करणार आहेत. दरम्यान, त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे.

किरीट सोमय्यांचे चॅलेंज

पवार, ठाकरेंना आव्हान

'इज्जत वाचवण्यासाठी सरकारने माझ्यावरची बंदी उठवली आहे. आता पवार, ठाकरेंनी माझ्यावर बंदी घालून दाखवावी', असे चॅलेंज किरीट सोमय्यांनी सरकारला दिले आहे. ते कोल्हापूरला जाताना पुणे-बंगळुरू महामार्गावर उंब्रज (ता. कराड) येथे भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी थांबले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.

इज्जत वाचवण्यासाठी...

'अंबामाता ही शक्तीची माता आहे. अंबेमातेने राक्षसाचा वध केला होता. त्याप्रमाणे घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा नाश करण्याची मला शक्ती द्यावी, अशी मी प्रार्थना अंबेमातेला करणार आहे. माझ्यावर बंदी घातली. पण त्या बंदीला कोणी भीकच घालत नव्हतं. ठाकरे, पवार साहेब हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे मी चॅलेंज केलं होतं. बंदी असली किंवा नसली तरी जनता किरीट सोमय्याच्या मागे आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. हा कोल्हापूरला जाणारच आणि मी गेलोच असतो. म्हणून स्वत:ची इज्जत वाचविण्यासाठी काल (सोमवारी) रात्री जिल्हाधिकार्‍यांनी सर्क्युलर काढलं', असं सोमय्यांनी सांगितलं.

हेही वाचा -बाळासाहेब आणि मुलींची शपथ, मी काहीही चुकीचं केलेलं नाही, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार - अनिल परब

हेही वाचा -प्रचारादरम्यान शिवसेनाप्रणित आमदाराची जीभ घसरली; काँग्रेस, राष्ट्रवादीवर खालच्या भाषेत टीका

ABOUT THE AUTHOR

...view details