सातारा- जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे नेते दीपक साहेबराव पवार यांची महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पवार यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला आणखी एक राज्यमंत्रीपद मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही निवड केली असून, पवारांच्या राजकीय गोटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सातारा : राजकीय ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्याला आणखी एक 'मंत्रीपद' - शशिकांत शिंदे
जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे नेते दीपक साहेबराव पवार यांची महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पवार यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला आणखी एक राज्यमंत्रीपद मिळाले आहे.
दीपक पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदेंचा पराभव करून जिल्हापरिषदेवर निवडून येण्याची हॅट्रिक साधली होती. जिल्ह्यात भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात. याचीच पावती म्हणून मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दीपक पवारांच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ घातली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ही निवड झाल्याने भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यात ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाची ही खेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरणार आहे.