महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 2, 2021, 6:51 AM IST

Updated : Jul 2, 2021, 7:10 AM IST

ETV Bharat / state

गट शिक्षणाधिकाऱ्याच्या निलंबनासाठी सीईओ पुढे ठाण मांडणार - चित्रा वाघ

महिलांवरील होणारे अत्याचारबाबत माहिती घेण्यासाठी मी साताऱ्यात आले आहे. ज्या छत्रपतीच्या महाराष्ट्रात आपण रहातो तिथं शिक्षण विभागातील व्यक्ती महिलेकडे शरीर सुखाची मागणी करतो हे गोष्टच लांछनास्पद आहे. आता या प्रकरणामध्ये विशाखा कमिटी गठीत करण्यात आली, मग इतका वेळ ही व्यवस्था का झाली नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

सीईओ पुढे ठाण मांडणार - चित्रा वाघ
सीईओ पुढे ठाण मांडणार - चित्रा वाघ



सातारा - राज्यात महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असून विकृतांना कोणाचेही भय उरलेले नाही. साताऱ्यातही गट शिक्षणाधिकारी एका महिलेकडे निर्लज्ज अपेक्षा व्यक्त करतो, या विकृती व्यवस्थेतून हद्दपार करण्यासाठी आम्ही भाजप कार्यकारिणीचे सदस्य सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठाणं मांडणार आहोत, असा परखड इशारा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी साताऱ्यात दिला.

सातारा जिल्ह्यात सोमर्डी व बेलावडे येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या. पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर गुरुवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, कायदा आघाडीचे अॅड प्रशांत खामकर,सुनेशा शहा, राहुल शिवनामे यावेळी उपस्थित होते.

सीईओ पुढे ठाण मांडणार - चित्रा वाघ
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, "महिलांवरील होणारे अत्याचारबाबत माहिती घेण्यासाठी मी साताऱ्यात आले आहे. ज्या छत्रपतीच्या महाराष्ट्रात आपण रहातो तिथं शिक्षण विभागातील व्यक्ती महिलेकडे शरीर सुखाची मागणी करतो हे गोष्टच लांछनास्पद आहे. आता या प्रकरणामध्ये विशाखा कमिटी गठीत करण्यात आली, मग इतका वेळ ही व्यवस्था का झाली नाही. लिंगपिसाट व्यक्तींना आज कोणाचाही धाक राहिला नाही, त्यामुळे याला आपण सर्वांनी धडा शिकवला पाहिजे.

सातारा पंचायत समितीमधील ज्या धुमाळने हे विकृत काम केलं आहे त्याला या व्यवस्थेतून हद्दपार केले पाहिजे. गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी आम्ही सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापुढे ठाण मांडणार आहोत, असा इशारा चित्रा वाघ यांनी यावेळी दिला.

राज्यात पोक्सोच्या केसेसमध्ये वाढ झाली आहे. याबाबीकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. कोरोना काळातही असेच गुन्हे होत आहेत, अन् त्याला या महाविकास आघाडीकडून राजाश्रय मिळत आहे, ही बाब दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासनमध्ये अशा प्रकारची विकृत माणसं आहेत. महिलांवरील अत्याचार होऊनही तक्रार दाखल होत नाही. त्यामुळे राज्यात कायदा अन् प्रशासनाचा बोजवारा उडालेला दिसत आहे. हा राज्यासाठी गंभीर प्रश्न आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, ज्याच्याशी सरकारला काही देणं घेणं आहे की नाही असा प्रश्न पडतो? अत्याचारित महिलांच समुपदेशन महत्वाचे आहे. अन् सरकारच्या माध्यमातून ते मिळण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचेही वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोठे आहेत?

महिलांवरील अत्याचार हा राजकीय प्रश्न नाही पण या सामाजिक प्रश्नाकडे सरकार आपली जबाबदारी झटकत आहेत. ही बाब दुर्दैवी आहे. सरकारने सगळ्या गोष्टीत राजकारण करावे पण महिला कौन्सिलिंग साठी पुढे आले पाहिजेत, आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कुठं आहेत हाही प्रश्न समोर येत आहे. जिल्ह्यातील अत्याचारित कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी भेट घेतली का? पालक या शब्दाचा अर्थ काय असतो? असे सवाल चित्रा वाघ यांनी करत राज्यात दोन दोन गृहमंत्री असताना महिला अत्याचारामध्ये वाढ व्हावी या विषयी चिंता व्यक्त केली.

महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहे. वनक्षेत्रपाल दिवंगत दीपाली चव्हाणच्या लढाईला चांगले वकील देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. एसओपी बाबत कोणताही निर्णय नाही. सरकारला तोंड दाखवायला वेळ नाही, आता दोन दिवसांच अधिवेशन आहे. अन् यामध्ये राज्याशी निगडीत संवेदनशील किती मुद्धे मांडले जाणार आहेत? अशी शंका चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.


Last Updated : Jul 2, 2021, 7:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details