महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरवळजवळ दुचाकी घसरून अपघात; एक ठार, एक गंभीर - satara marathi news

साताऱ्यावरून पुण्याकडे जाताना शिरवळ जवळील केसुर्डी फाटा येथे काल रात्री साडेआठ वाजता अपघात झाला.

शिरवळ अपघात
शिरवळ अपघात

By

Published : Dec 8, 2020, 2:48 AM IST

सातारा -साताऱ्यावरून पुण्याकडे जाताना शिरवळ जवळील केसुर्डी फाटा येथे काल रात्री साडेआठ वाजता अपघात झाला. भरधाव वेगात जाणारी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

जखमी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल-

जखमीस शिरवळ येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. साताऱ्याहुन दुचाकी गाडी (क्रमांक एमएच 13 बी डब्लु 5577) वरुन पुण्याला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात प्रकाश मधुकर कोरके (वय 34 रा.भोसे ता.पंढरपूर जि,सोलापूर) हे जागीच ठार झाले.

तर दुचाकी चालक आयतीडोरी सितारायन रा. धर्मपुरी राज्य तामिळनाडू हे गंभीर जखमी झाले. शिरवळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली आणि जखमीस उपचारासाठी नेले.

हेही वाचा-राज्यात ३ हजार ७५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ४० रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details