महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chief Minister on Satara : महाराष्ट्रात लवकरच मोठे प्रकल्प येतील - एकनाथ शिंदे

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) व गृहमंत्री अमित शहा ( Home Minister Amit Shah ) यांच्याशी संपर्क ठेवून आहोत. महाराष्ट्रात लवकरच मोठे प्रकल्प येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी व्यक्त केला. राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्याला कोण जबाबदार आहे, याबद्दल मी बोलणार नाही, असे सांगत त्यांनी विषयाला बगल दिली. मुख्यमंत्री दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत, तेव्हा ते बोलत होते.

Chief Minister on Satara
महाराष्ट्रात लवकरच मोठे प्रकल्प येतील

By

Published : Oct 31, 2022, 10:56 PM IST

सातारा : आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) व गृहमंत्री अमित शहा ( Home Minister Amit Shah ) यांच्याशी संपर्क ठेवून आहोत. महाराष्ट्रात लवकरच मोठे प्रकल्प येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी व्यक्त केला. राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्याला कोण जबाबदार आहे, याबद्दल मी बोलणार नाही, असे सांगत त्यांनी विषयाला बगल दिली. मुख्यमंत्री दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत, तेव्हा ते बोलत होते.


मला राजकारण करायचे नाही - महाबळेश्वर तालुक्यातील दरे बुद्रुक या मूळगावी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गावात येताच त्यांनी ग्रामदैवत उत्तरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आरती केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोण काय बोलतोय, त्याकडे मी दुर्लक्ष करतोय. महाराष्ट्रात लवकरच मोठे प्रकल्प येतील.

राज्याचा विकास व्हावा -मला कशातही राजकारण करायचे नाही. ग्रामदैवत उत्तरेश्वरच्या मंदिरात दर्शन घेऊन राज्यातील जनतेला सुख व समाधानाचे दिवस येऊन राज्याचा विकास वेगाने होवू दे, असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details