कराड(सातारा) - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कराड शहर आणि शहरालगतचचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व सेवा ठप्प आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून (दि. १ मे) कराड शहरात किराणा व भाजीपाला घरपोच देण्यात येणार आहे.
कराडमध्ये आता भिलवाडा पॅटर्न; शुक्रवारपासून किराणा, भाजीपाला मिळणार घरपोच - corona virus news
कराडमधील सर्व नगरसेवकांच्या मदतीने भिलवाडा, बारामती पॅटर्नच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येणार आहे. कराडसह लगतचा परिसर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आला आहे. गेली सहा दिवस घरपोच दूध वगळता कोणत्याही गोष्टीची सवलत देण्यात आलेली नव्हती. आता किराणा वस्तू व भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन १ मे पासून किराणा व भाजीपाला घरपोच देण्यात येणार आहे.
हेही वाचा-...बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे!
कराडमधील सर्व नगरसेवकांच्या मदतीने भिलवाडा, बारामती पॅटर्नच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येणार आहे. कराडसह लगतचा परिसर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आला आहे. गेली सहा दिवस घरपोच दूध वगळता कोणत्याही गोष्टीची सवलत देण्यात आलेली नव्हती. आता किराणा वस्तू व भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन १ मे पासून किराणा व भाजीपाला घरपोच देण्यात येणार आहे. याचे नियोजन नगरसेवकांकडे देण्यात आले आहे. नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना किराणा व भाजीपाला घरपोच द्यायचा आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.