सातारा -जावळी तालुक्यातील भणंग या एकमेव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व अपक्ष उमेदवारांनी बाजी मारत पक्षीय उमेदवारांचा पराभव केला आहे. संपुर्ण राज्यात या निकालाची चर्चा असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधील उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारले आहे.
साताऱ्यातील भणंग ग्रामपंचायतीत अपक्षांचा बोलबाला, पक्षीय उमेदवार पराभूत - भणंग ग्रामपंचायत निकाल 2022
जावळी तालुक्यातील भणंग या एकमेव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व अपक्ष उमेदवारांनी बाजी मारत पक्षीय उमेदवारांचा पराभव केला आहे. संपुर्ण राज्यात या निकालाची चर्चा असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधील उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारले आहे.
भाजप-राष्ट्रवादीचे पॅनेल होते आमनेसामने -भणंग ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे समर्थकांची पॅनेल आमनेसामने होती.या निवडणुकीत अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने उतरले होते. सोमवारी मतमोजणी होऊन भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलचे उमेदवार पराभूत झाले तर सर्व अपक्ष उमेदवार निवडून आले. या निकालामुळे दोन्ही आमदारांना धक्का बसला आहे.
भणंगच्या निकालाची राज्यात चर्चा -भाजप आणि राष्ट्रवादी आमदारांच्या समर्थकांची दोन पॅनेल आमनेसामने होती. त्यांच्या विरोधात स्थानिक पॅनेलचे तीन आणि चार अपक्ष निवडणूक रिंगणात होते. एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते दीपक पवार यांच्या समर्थक अपक्षाने बाजी मारली, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटाचाही एक अपक्ष निवडून आला. सर्व अपक्ष उमेदवार निवडून आल्याने साताऱ्यासह संपूर्ण राज्यात या निकालाची चर्चा आहे. २ हजार लोकसंख्या असलेल्या भणंग गावात १२५० मतदार आहेत.