सातारा - गर्भवती वनरक्षकास लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण ( Beating a Pregnant Forest Woman Security Guard )करणारा रामचंद्र जानकर याच्या कृत्याचे विविध कारनामे पुढे आले आहेत. यापुर्वी त्याने एका शिक्षकालाही असाच त्रास दिल्याची माहिती पुढे आली आहे. मारहाण प्रकरणी जानकर व त्याच्या पत्नीची न्यायालयाने ३ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी ( Accused Ramchandra Jankar and His Wife Sent in Police Custody ) केली.
अनेकांना दिलाय त्रास -
मारहाण प्रकरणानंतर रामचंद्र जानकर याचे विविध कारनामे पुढे आले आहेत. त्याचे राजकीय क्षेत्रात लागेबांधे आहेत. त्याचा उपयोग करुन तो गावात जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सोईची भुमिका घ्यायला लावायचा. जो ऐकणार नाही त्याविरोधात तक्रारी सुरू व्हायच्या. यापुर्वीचे शिक्षक, कहसूल कर्मचारी मेटाकूटिस आले होते, असे ग्रामस्थ खासगीत सांगतात.
जानकर दाम्पत्याची कोठडीत रवानगी -
प्राणी गणनेसाठी वनमजुर महिलांना घेऊन गेल्याच्या रागातून चार महिन्यांच्या गरोदर वनरक्षक महिलेस पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार रामचंद्र व प्रतिभा जानकर यांनी केला. पळसावडे (ता. सातारा) येथे हा प्रकार घडला. यावेळी वनरक्षक पतीसही मारहाण झाली होती. याबाबत सोशल मीडियातून मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने याची दखल घेत पोलीस अधीक्षकांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी मध्यरात्रीच जानकर दाम्पत्याला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.