सातारा - सैनिकांचा जिल्हा म्हणून लौकिक असलेल्या सातारा जिल्ह्यातील सैनिक स्कूलमध्ये प्रथमच १० मुली प्रवेशप्रक्रीया पार पाडून दाखल झाल्या आहेत. (Women's Day theme) देशातील पहिल्या सैनिक स्कूलमध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम सुरु झाले आहे.मुलांच्या खांद्याला खांदा लावून या दहा मुलींनी 'छोरियां छोरों से कम ना है' हाच संदेश महिला दिनानिमित्त दिला आहे. (Happy Women's Day) आज जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला आमचे प्रतिनिधी शैलेन्द्र पाटील यांनी सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या १० मुलींशी बातचित केली.
६३० विद्यार्थ्यांत १० मुली
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने (२३ जून १९६१)रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्यात सुरु झाली. (Women's Day significance) या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १२ पर्यंत शिक्षण दिले जाते. (first soldier school In India) ६४० विद्यार्थी येथे शिकतात. पैकी १० मुलींना यावर्षी प्रथमच प्रवेश मिळाला आहे. (soldier school in satara) निवासी शाळेत शिकणारी ही मुलींची पहिलीच बॅच आहे.
भविष्यात मुलींच्या जागा वाढतील
सैनिक स्कूलचे उपप्राचार्य विंग कमांडर बी लक्ष्मीकांत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले, आत्तापर्यंत या शाळेत केवळ मुलांना प्रवेश दिला जात होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय गेल्या वर्षी शासनाने घेतला. त्यामुळे सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी गेल्या ६१ वर्षांत प्रथमच खुले झाले. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी १० मुलींना निवासी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. यात दोन पश्चिम बंगालच्या, एक बिहारची तर उर्वीत सात विद्यार्थीनी महाराष्ट्रातील आहेत. भविष्यात मुलींच्या संख्येमध्ये वाढ होउ शकते.