महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी लढा सुरूच राहणार - पृथ्वीराज चव्हाण - Satara Ganeshotsav 2019

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरीदेखील गणपतीचे आगमन झाले. यावेळी त्यांनी राज्यातील तमाम जनतेला शुभेच्छा दिल्या.

बाप्पाची पुजा करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

By

Published : Sep 2, 2019, 9:11 PM IST

सातारा - आपल्याला राजकीय स्वातंत्र्य आहे. मात्र, सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचे आहे, आणि त्याविरुद्ध लढा सुरूच राहील, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तसेच हा लढा यशस्वी व्हावा, यासाठी त्यांनी बाप्पाकडे मागणी केली. व राज्यातील तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. चव्हाण यांनी देखील आज आपल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत केले. गणेशोत्सव हा सर्व समाजांना बांधणारा उत्सव आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरीदेखील गणपतीचे आगमन

जिल्ह्यातील अनेक मोठ्या मंडळांच्या मूर्ती स्थापना रात्री उशिरापर्यंत होणार आहेत. तर काही ठिकाणी मुर्ती स्थापन झाल्या आहेत. बुद्धी देवता म्हणून ओळखल्या जाणाऱया आपल्या लाडक्या गणेशाला मोठया थाटा आपल्या घरी घेऊन पूजा केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details