महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेला काशिनाथाचा जयघोष, उदयनराजेंच्या हस्ते बगाडाचे पूजन - Bagad Yatra

संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा रविवारी ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बगाडाचे पूजन करून बगाड यात्रेला प्रारंभ झाला.

Bagad Yatra
Bagad Yatra

By

Published : Mar 12, 2023, 10:54 PM IST

उदयनराजेंच्या हस्ते बगाडाचे पूजन

सातारा : संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा रविवारी ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बगाडाचे पूजन करून बगाड यात्रेला प्रारंभ झाला.

बावधनच्या बगाड यात्रेला सुरवात

बगाडाला नारळ, नोटांचे तोरणे :बगाड्याचा मान मिळालेल्या दिलीप दाभाडे यांना कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा-अर्चा करून बगाड्याला वाजत गाजत बगाडाजवळ नेण्यात आले. पारंपरिक पध्दतीचा पोषाख घालून त्यांना बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधण्यात आले होते.

बावधनच्या बगाड यात्रेला सुरवात

होळी पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात :बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे दरवर्षी बगाड यात्रा भरते. इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये बगाडाची परंपरा चालत आलेली आहे. होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते तर रंगपंचमीदिवशी बगाड यात्रेचा मुख्य दिवस असतो.

यात्रेत फक्त खिल्लार बैलांचा वापर :बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. कारण खिल्लार बैलांशिवाय इतर कोणताही गोवंश इतक्या ताकतीचा नाही. म्हणूनच बावधनमधील प्रत्येक घरामध्ये एक तरी धिप्पाड खिल्लार पाळला जातो. त्यामुळे बावधनची बगाड यात्रा वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

बगाड म्हणजे काय? : बावधन येथील यात्रेतील बगाडाचे वजन तब्बल २ ते ३ टन इतके असते. बागडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती साठी, साठी वरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड अशी बगाडाची रचना असते. बगाडाच्या शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो.

नवस पूर्ण झालेल्या व्यक्तीला बगाड्याचा मान :होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनच्या बगाड यात्रेचा बगाड्या निवडला जातो. ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच व्यक्तीला बागड्या म्हणून निवडले जाते. बावधन गावातील सुतार समाज मिळून हे बगाड बनवतात.

हेही वाचा -Pollution in Mumbai: मुंबईत प्रदूषण करणाऱ्यांवर १ एप्रिलपासून कारवाई, जी २० साठी पुन्हा सुशोभीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details