सातारा -तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी भाजपचे सरचिटणीस आणि विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीचे माजी अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी 50 हजार रूपयांचा धनादेश दिला. तानाजी मालुसरेंच्या वंशज शीतल मालुसरे यांच्याकडे मदतीच्या रकमेचा धनादेश डॉ. भोसले यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. शिवनगर (ता. कराड) येथील जयवंत इंजिनियरिंग महाविद्यालय आणि जयवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यमाने शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
‘रायबा’च्या शिक्षणासाठी डॉ. अतुल भोसलेंचा हातभार; ५० हजारांची दिली मदत
तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी भाजपचे सरचिटणीस आणि विठ्ठल मंदीर समितीचे माजी अध्यक्ष अतुल भोसले यांनी ५० हाजर रुपयांची मदत केली. ही मदत शीतल मालुसरे यांच्याकडे देण्यात आली.
स्वराज्यासाठी बलिदान देणार्या मावळ्यांच्या वंशजांना मदत करणे समाजाचे कर्तव्य आहे. समाजातील प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन डॉ. अतुल भोसले यांनी केले. नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देखील डॉ. भोसले यांनी दिली. सगळी सोंगे करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही. डॉ. अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वराज्यासाठी बलिदान देणार्या वंशजांना मदत केली आहे. अशी मदत करणारे ते एकमेव आहेत, असे शीतल मालुसरे म्हणाल्या. रायबाच्या शिक्षणासाठी ही मदत लाख मोलाची असल्याचेही मालुसरे यांनी सांगितले.