सातारा:घरासमोर बसण्याच्या कारणावरून तरूणावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार गुंडासह दोघांना कराड शहर पोलिसांच्या Karad City Police गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. निशिकांत शिंदे आणि परशुराम रमेश करवले, अशी त्यांची नावे आहेत. Karad Crime त्यांच्याकडून 1 लाख रुपये किंमतीची 2 पिस्तुले आणि धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही संशयितांना अटक:कराडमधील मुजावर कॉलनीत घरासमोर बसण्याच्या वादातून पिस्तुलातून गोळ्या झाडून एकाच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी शाहरुख मुल्ला याने कराड शहर पोलीस ठाण्यात Karad City Police Station निशिकांत शिंदे आणि परशुराम करवले यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंद केली होती. Karad City Police Stationवरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्याकडे तपास दिला होता. बाबर यांच्या पथकाने निशिकांत शिंदे यास कराड आणि तडीपार गुंड परशुराम करवले याला आटपाडी ता. खानापूर जि. सांगली येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.