महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न

सहकारी बँकेने लाखो रुपयांची फसवणूक केल्याने एका कुटुंबातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली.

agitator and police
agitator and police

By

Published : Aug 15, 2020, 2:26 PM IST

सातारा -येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि.15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी एका कुटुंबातील नागरिकांनी आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी विशाल नलावडे आणि त्याचा कुटुंबीयांची 41 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप नलावडे कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. आज सकाळी ध्वजारोहण करण्याच्या वेळी या नलावडे कुटुबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच धाव घेत पोलिसांनी या कुटुंबाला आत्मदहन करण्यापासून रोखले आहे. यावेळी आंदोलकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. या कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details