सातारा - स्वातंत्र्य दिनानिमित्त आज (रविवारी) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वेगवेगळ्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. आसरे गावातील 7 जणांनी जमीन बळकावल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न - सातारा जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार तसेच कार्यालयाच्या आवारात पोलिसांचा फौजफाटा पाहून अंगावर राॅकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांची पोलिसांनी धरपकड केली.
2018 मध्ये आसरे गावातीलच एका प्रतिष्ठित व्यक्तीने सरकारी भूखंड हडप केल्याचा आरोप आत्मदहनकर्त्यांनी केला आहे. या आंदोलनकर्त्यांनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सांगून महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. ३ वर्षे झाली तक्रार करुनही कारवाई झाली नाही. उलट आमचीच चौकशी करत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार तसेच कार्यालयाच्या आवारात पोलिसांचा फौजफाटा पाहून अंगावर राॅकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांची पोलिसांनी धरपकड केली.