महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारू अड्ड्यावर छापा मारून परतणाऱ्या पोलिस पथकावर हल्ला - satara police

अपशिंगे (मि.) येथील दारू अड्ड्यावर छापा टाकून संशयितासह पोलीस ठाण्याकडे परतणाऱ्या पोलीस पथकावर पाच जणांनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या हल्ल्यात २ पोलीस किरकोळ जखमी झाले

बोरगांव पोलीस स्टेशन
बोरगांव पोलीस स्टेशन

By

Published : Oct 17, 2020, 7:49 AM IST

सातारा- अपशिंगे (मि.) येथील दारूधंद्यावर छापा टाकून संशयितासह पोलीस ठाण्याकडे परतणाऱ्या पोलीस पथकावर पाच जणांनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या हल्ल्यात २ पोलीस किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी दारूविक्रेत्यासह हल्ला करणाऱ्या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले असून एक हल्लेखोर फरार आहे. हल्लेखोरांवर सरकारी कामात अडथळा आणला तसेच इतर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संकेत राजेंद्र निकम उर्फ बिच्चू, नितीन नवनाथ निकम, निरंजन नारायण निकम उर्फ बाळा, श्रीकांत विलास निकम, कृषिकेश शंकर सुर्यवंशी उर्फ सोन्या (रा.अपशिंगे मिलीट्री, ता.सातारा) असे या हल्लेखोरांची नावे असून ओमप्रकाश हरिदास राठोड, असे ताब्यात घेतलेल्या दारूविक्रेत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलीट्री अपशिंगे येथे ओमप्रकाश राठोड हा चोरून दारूविक्री करत असल्याची माहिती पोलिसांना समजली. सहाय्यक फौजदार भीमराव यादव व इतर कर्मचा-यांनी अपशिंगे (मि.) ते वर्णे जाणाऱ्या रोडलगत छापा टाकून ओमप्रकाश राठोड याला रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळून देशी दारूच्या ३९ व बिअरच्या १० बाटल्या अश्या २ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

हेही वाचा-शुभसंकेत मानायचे का? नवजात बाळानं डॉक्टरांच्या तोंडावरचा मास्क ओढला


मुद्देमालासह संशयिताला घेऊन पोलिसपथक बोरगावकडे येत असताना अपशिंगे (मि.) गावच्या एसटी थांब्याजवळ त्यांच्या गाडीला तीन दुचाकी आडव्या लावून घेराव घातला गेला. संकेत राजेंद्र निकम याने 'ओमप्रकाश राठोड माझा मित्र आहे. तुम्ही त्याच्यावर रेड का टाकली?' असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत पोलिसांच्या चारचाकी गाडीवर हल्ला केला. यामध्ये गाडीची काच फोडली. त्याच्या इतर साथीदारांनीही पोलीस पथकावर हल्ला केला.

हेही वाचा-राज्यभरात पुराचा कहर... पीकं जमीनदोस्त; तर शेतांना तळ्याचे स्वरुप!

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ओमप्रकाश राठोड याला त्यांनी सोडवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवत असलेल्या हवालदार प्रशांत मोरे व सत्यम थोरात यांना दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. पोलिसांनी शिताफीने हल्लेखोरांपैकी नितीन निकम व ओमप्रकाश राठोड याला पकडून बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. या हल्ल्यात हवालदार प्रशांत मोरे व सत्यम थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी निकमकडून उर्वरित हल्लेखोरांनी नावे उघड करत त्यांना ताब्यात घेतले. संकेत निकम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details