कराड (सातारा) - शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये आणि त्यांच्या समोरच एकाला चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवारी) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
सातारा : पोलीस निरीक्षकासमोरच ठेकेदाराला भोसकले; एक गंभीर - karad city police station news
एकाने कराड शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये आणि त्यांच्या समोरच एकाला चाकूने भोसकले. किशोर पांडुरंग शिखरे (रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड), असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा -'संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडीलांना दिले पाच कोटी रुपये!'
तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी आलेल्या एकाने कराड शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये आणि त्यांच्या समोरच एकाला चाकूने भोसकले. किशोर पांडुरंग शिखरे (रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड), असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो ठेकेदार आहे. याप्रकरणी लखन भागवत माने (रा. बनवडी, ता. कराड) यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जखमीला तातडीने कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले.