सातारा -तालुक्यातील एका गावात महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो काढले. शिवाय फोटो कुटुंबीय व नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका अटक करण्यात आले आहे.
कुटुंबियांना फोटो दाखवण्याची धमकी
साताऱ्यात विवाहित महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक - सातारा महिलेवर अत्याचार
स्वरूप गुजर याने हा प्रकार 2018 ते 21 मे 2021 या कालावधीत केला आहे. पीडित महिलेशी शारीरिक संबंधाचे फोटो त्याने काढले. नंतर या कालावधीत सातत्याने हे फोटो तिचा पती, मुलगा व नातेवाईकांना दाखवण्याची धमकी तो देत होता. त्या बदल्यात तो तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवत होता.
याप्रकरणी स्वरूप महादेव गुजर (वय 50, रा. हिरण्या प्राइड अपार्टमेंट, तामजाई नगर, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वरूप गुजर याने हा प्रकार 2018 ते 21 मे 2021 या कालावधीत केला आहे. पीडित महिलेशी शारीरिक संबंधाचे फोटो त्याने काढले. नंतर या कालावधीत सातत्याने हे फोटो तिचा पती, मुलगा व नातेवाईकांना दाखवण्याची धमकी तो देत होता. त्या बदल्यात तो तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवत होता.
चाकू लावून घेतला एटीएमचा पिन
शरीर संबंधास नकार दिल्यानंतर गुजर याणे महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्याकडून एटीएमचा पिन क्रमांक घेतला. तसेच तिच्या बँक खात्यातून एक लाख 50 हजार रुपये काढून घेतले. आजपर्यंत एकूण दोन लाख रुपये धमकी देऊन काढण्यात आल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी स्वरूप गुजरला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.