महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान राहतील तोपर्यंत देशात विखारी वातावरण -पृथ्वीराज चव्हाण

नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान राहतील तोपर्यंत देशात विखारी आणि विषारी वातावरण राहील. त्यामुळे आव्हानांचा अभ्यास करून कॉंग्रेसला येऊ घातलेली लोकसभा निवडणूक जिंकावीच लागेल, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे ते दिवाळी फराळ कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीVsमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदीVsमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

By

Published : Oct 25, 2022, 7:17 PM IST

सातारा -भारत जोडो यात्रा म्हणजेच मोदी हटाव यात्रा असून नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान राहतील तोपर्यंत देशात विखारी आणि विषारी वातावरण राहील. त्यामुळे आव्हानांचा अभ्यास करून कॉंग्रेसला येऊ घातलेली लोकसभा निवडणूक जिंकावीच लागेल, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

मोदींचा पराभव करावाच लागेल -खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा सकारात्मक प्रभाव २०२४ मधील लोकसभा निवडणुकीवर दिसून येईल. आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला नरेंद्र मोदींचा पराभव करावाच लागेल, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

'जी २३' चा हेतू सफल -नजिकच्या काळात हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांच्या निवडणुका होत आहेत. तर, २०२४ ला लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्याचा अभ्यास करून यापुढील वाटचाल करावी लागेल. तब्बल २२ वर्षानंतर काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडली आहे. त्यामुळे 'जी २३' चा हेतू सफल झाला आहे. आम्ही मागणी लावून धरली नसती, तर कदाचित अजूनही अशा निवडणुका झाल्या नसत्या. आता नवे अध्यक्ष पक्षांतर्गत लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

तर आमचेच सरकार सत्तेवर आले असते -२०१४ साली राज्यातील आमचे सरकार पाडले नसते, तर पुन्हा आमचेच सरकार सत्तेत आले असते. राज्यात फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आणायला कोण कारणीभूत आहे, हे सर्वांना माहीत आहे, असा खोचक टोमणा नाव न घेता पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला लागावला आहे.

सरकारची स्थिती विदारक - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची स्थिती विदारक आहे. अजून पूर्णपणे मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर एकमत होत नाही. त्यांच्यात अंतर्गत कलह आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेण्याचा भाजपचा डाव आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details