सातारा - फेसबुकवरील फोटोचा वापर करुन महिलेची बदनामी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुकवरील महिला व मुलींच्या फोटोंमध्ये फेरफार करणे, अश्लिल फोटो फेसबूक व समाज माध्यमांवर टाकणे, याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फेसबुकवरील फोटो वापरून महिलेची बदनामी करणाऱ्याला पुण्यात अटक
फेसबुकवरील महिला व मुलींच्या फोटोंमध्ये फेरफार करणे, अश्लिल फोटो फेसबूक व समाज माध्यमांवर टाकणे, याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.
हॉटेलमध्ये सापळा रचून अटक-
जानेवारी २०२० मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपीचा शोध सुरू होता. वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे सिंहगड रोड, पुणे येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून संशयिताला गजाआड केले. प्रविण रेमजे असे संशयितांचे नाव आहे. त्यास वाई न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फेसबुकवरील फोटोचा गैरवापर-
जानेवारी २०२० दरम्यान एका मुलीस बनावट फेसबुक खात्यावरून संशयिताने फेसबुक मेसेंजरवर ओळख काढली. यावेळी त्याने मुलीचा व्हॉटसअॅप मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तिच्या फेसबुकवरील फोटोचा गैरवापर करुन अश्लिल फोटो तयार केले. ते फोटो मुलीला पाठविले, तसेच बनावट फेसवबुक खात्यावर पाठविले. याबाबत पीडित मुलीच्या दाखल तक्रारीवरून दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी अज्ञात आरोपीचा तांत्रिक पध्दतीने व खबऱ्यामार्फत तपास केला.
सहकाऱ्याचे सिमकार्ड चोरून गैरकृत्यू-
संशयिताने बीड येथील दुसऱ्याच्या नावावर असलेले सिमकार्डचा वापर करुन बनावट फेसबुक खाते उघडून वाशी, रत्नागीरी, वाई येथील मुली व महिलांची अशाच पद्धतीने बदनामी केली होती. व त्याच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. पुण्यात हॉटेलमध्ये वेटरकाम करताना सहकाऱ्याचे सिमकार्ड चोरून संशयिताने हे गैरकृत्य केले.
पोलीस कोठडीत रवानगी-
संशयीताचे सर्व मोबाईल बंद लागत होते. त्याच्या सध्याच्या ठावठिकाणाची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे संशयित सापडत नव्हता. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तांत्रिक माहिती मिळवत त्याला पुण्यातून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
वाईचे सहाय्यक फौजदार विजय शिर्के, कृष्णराज पवार, प्रशांत शिंदे, सोमनाथ वल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा-मुंबईत कोरोनाचे 643 नवे रुग्ण, 12 रुग्णांचा मृत्यू