महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आमची मापे अन् कुंडल्या ठेवणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, अपने पास भी सबकी कुंडली है' - lok sabha

आधी आपण आपल्या भागात राहायला या, मग इथल्या लोकांच्या अडचणी समजतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले

By

Published : Apr 2, 2019, 7:50 PM IST

सातारा - आमची मापे व कुंडल्या ठेवणाऱ्यांनीही लक्षात ठेवावे, की 'अपने पास भी सबकी कुंडली है', अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे यांच्या कॉलर उडवण्यावरून नरेंद्र पाटील यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील हेही उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले

आधी आपण आपल्या भागात राहायला या, मग इथल्या लोकांच्या अडचणी समजतील. आम्ही कॉलर उडवतो म्हणून आमच्यावर टीका करण्यापेक्षा दिलेल्या कामाची आणि दिलेल्या शब्दाची पूर्तता करा, उगीच विषय सोडून आरोप करू नका, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

तुम्ही मुंबईत राहता. नुसते कामापुरते भागात येऊन विकास होत नाही. कॉलर उडण्याची टीका नरेंद्र पाटील यांनी केली. मात्र, आमची मापे व कुंडल्या ठेवणाऱ्यांनी पण लक्षात ठेवावे, की 'अपने पास भी सबकी कुंडली है' असा डायलॉग खासदार उदयनराजे भोसले यांनी पाटील यांना उद्देशाने मारला.

ABOUT THE AUTHOR

...view details