महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे प्रवास करून आलेला 28 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह; 86 जण विलगीकरण कक्षात - covid 19

आता सातारा जिल्ह्यात 41 रुग्ण कोरोनाबाधित असून, आतापर्यंत 5 रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सोडले आहे. 2 जणांचा मृत्यू झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा हाॅस्पिटल कराड येथील 6, कराड उपजिल्हा रुग्णालय 44, फलटण येथील 2 असे एकूण 58 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.

another one covid 19 positive patient found in satara
पुण्याचा प्रवास करून आलेला 28 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह; 86 जण विलगीकरण कक्षात

By

Published : Apr 28, 2020, 5:23 PM IST

सातारा - पुणे येथून प्रवास करून आलेल्या 28 वर्षीय युवकाला 25 एप्रिलला फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19) बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे, माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याची माहिती दिली. या रुग्णावर पुढील उपचार सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात करण्यात येणार आहे.

आता सातारा जिल्ह्यात 41 रुग्ण कोरोनाबाधित असून, आतापर्यंत 5 रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सोडले आहे. 2 जणांचा मृत्यू झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा हाॅस्पिटल कराड येथील 6, कराड उपजिल्हा रुग्णालय 44, फलटण येथील 2 असे एकूण 58 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.

27 एप्रिलला रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 21, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 8 असे एकूण 86 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details