सातारा - महाबळेश्वर बसस्थानकात बॉंब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे एकच खळबळ उडाली (Anonymous call of bomb placed). बुधवारी सकाळपासून दहशतवाद विरोधी शाखा, बॉंब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाने बसस्थानक, टॅक्सी स्टॅंड परिसराची कसून तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
महाबळेश्वर बसस्थानकात बॉंब ठेवल्याचा निनावी फोन, एटीएस, बीडीएसची कसून तपासणी, हाती काहीच नाही - Anonymous call of bomb placed
महाबळेश्वर बसस्थानकात बॉंब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे बुधवारी सकाळपासून दहशतवाद विरोधी शाखा, बॉंब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाने बसस्थानक, टॅक्सी स्टॅंड परिसराची कसून तपासणी केली (Anonymous call of bomb placed). मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
वरिष्ठ अधिकारी तातडीने पोहोचले महाबळेश्वरला - महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या बसस्थानकात बॉंब ठेवला असल्याचा निनावी फोन अज्ञाताने मंगळवारी (दि. ६) केला. बॉंब ठेवण्यात आलेल्या गाडीचा क्रमांकही पोलिसांना सांगितला. त्यामुळे महाबळेश्वर पोलीस हादरले. तातडीने मोठा फौजफाटा घेऊन महाबळेश्वर एसटी स्टॅन्ड परिसराची तपासणी केली. तसेच बुधवारी सकाळी दहशतवाद विरोधी शाखा, बॉंब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. बस स्थानक तसेच टॅक्सी स्डॅंडची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तो फेक कॉल होता. मात्र, पोलीस आता फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत, असे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.