महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाच हजाराची लाच घेणारा आरटीओ एजंट लाचलुचपतच्या जाळ्यात - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे

अ‍ॅक्टिवा मोटरसायकलचे पासिंग करून देण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्विकारणार्‍या एजंटास लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

bribe
bribe

By

Published : Dec 11, 2020, 6:19 AM IST

कराड (सातारा) - अ‌ॅक्टिवा मोटरसायकलचे पासिंग करून देण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्विकारणार्‍या एजंटास लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. राजू जाधव, असे लाचखोर खासगी एजंटचे नाव आहे. त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पाच हजार रूपयांची केली होती मागणी-

अ‍ॅक्टिवा मोटरसायकलचे पासिंग करून देण्यासाठी कराड आरटीओ कार्यालयातील खासगी एजंट राजू जाधव याने तक्रारदाराकडे पाच हजार रूपयांची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, हवालदार संकपाळ, कलकुटगी, पोलीस नाईक खाडे, महिला पोलीस नाईक माने यांच्या पथकाने सापळा लावला होता. त्यामध्ये राजू जाधव हा लाचखोर एजंट अलगद अडकला.

हेही वाचा-वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात...

ABOUT THE AUTHOR

...view details