महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kalubai Temple Theft : काळूबाई मंदिराच्या दानपेटीतील रक्कम मोजणाऱ्याचाच दीड लाखावर डल्ला - amount of one and a half lakh stolen

काळूबाई मंदिराच्या (Kalubai Temple Theft) दानपेटीतील रक्कम मोजणाऱ्या एकाने कर्मचाऱ्यानेच दीड लाखाच्या (amount of one and a half lakh stolen) रक्कमेसह सोन्याचे दागिन्यांची चोरी (Gold ornaments theft) केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Kalubai Temple Theft
काळूबाई मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरी

By

Published : Dec 13, 2022, 8:15 PM IST

सातारा :मांढरदेव (ता. वाई) येथील काळूबाई मंदिराच्या (Kalubai Temple Theft) दानपेटीतील रक्कम मोजणाऱ्या एकाने कर्मचाऱ्यानेच दीड लाखाच्या (amount of one and a half lakh stolen) रक्कमेसह सोन्याचे दागिन्यांची चोरी (Gold ornaments theft) केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest news from Satara) दरम्यान, जिल्हा न्यायाधीश हे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ट्रस्टचे विश्वस्त असल्याने पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. (Satara Crime)


कर्मचाऱ्यावर संशय :काळूबाई देवीला भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देतात. देणगीची दर महिन्याला खासगी इसमांकडून मोजणी केली जाते. सोमवारी दुपारी दानपेटीतील पैसे आणि दागिन्यांची ट्रस्टींच्या उपस्थितीत मोजणी सुरू होती. यावेळी एका कर्मचाऱ्याने दोन, तीन वेळा आत बाहेर केले. खासगी नेमणुकीवर असलेल्या निवृत्त बँक कर्मचाऱ्याच्या संशयास्पद हालचालीमुळे ट्रस्टींनी त्याची झाडाझडती घेतली. त्यावेळी त्याच्या गाडीत दीड लाखाची रोख रक्कम आणि काही सोन्याचे दागिने आढळून आले.


संशयितावर गुन्हा दाखल :घटनेची माहिती मिळताच वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. हा प्रकार किती महिन्यांपासून सुरु होता ? आत्तापर्यंत किती रकमेचा अपहार झाला आहे? ट्रस्टचे कर्मचारी सामील आहेत काय ? याची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ :जिल्हा न्यायाधीश हे काळूबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तसेच वरिष्ठ अधिकारी हे प्रशासकीय विश्वस्त असल्याने या घटनेची माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. ट्रस्टकडून माहिती घ्या, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल बंद करून ठेवल्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details