सातारा -महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर येत आहेत. आज आणि उद्या (रविवारी) ते सातार्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. रयत शिक्षण संस्थेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ते आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौर्याची सुरवात करणार आहेत. त्यांच्या दौर्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आज सायंकाळी सातार्यात -राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचे शनिवारी सायंकाळी सहा वाजता सातार्यात आगमन होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने त्यांचे सातारा शासकिय विश्रामगृहात स्वागत होणार आहे. रविवारी सकाळी साडे दहा वाजता ते रयत शिक्षण संस्थेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौर्यास सुरवात करणार आहेत. त्यानंतर सातारा शासकिय विश्रामगृहात दुपारपर्यंत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.