सातारा :तालुक्यातील समर्थगावजवळ असलेल्या भंगारातील प्लास्टिकचे रिसायकलिंग ( Plastic Recycling Company Fire ) करणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत कंपनीचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कामगारांना सुट्टी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सुट्टीमुळे लवकर कळले नाही -
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निसराळे फाटा येथून पाली-सासपडे-तारळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल ही कंपनी आहे. या कंपनीत भंगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग केले जाते. रविवारी दुपारी या कंपनीस मोठी आग लागली. रविवार कामगारांना सुट्टी असल्याने कंपनीत कोणीही नव्हते. त्यामुळे आग लागलेली लवकर लक्षात आली नाही. वाऱ्यामुळे आगीने तत्काळ रौद्ररूप धारण केले. धुरांचे लोट सुमारे १५ किलोमीटरच्या परिघात लांबून दिसत होते.ॉ