महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Independence Day स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कराडमधील अलंकार ग्रुपने केला 75 माजी सैनिकांचा गौरव - अलंकार ग्रुप कराड

कराडमधील हॉटेल अलंकार ग्रुपने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 माजी सैनिकांचा गौरव करून शहीद जवान तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. सातार्‍याच्या भुमीने देशासाठी मोठे बलिदान दिले असून अजुनही देत आहे. सर्वाधिक शहीद जवान देणारा सातारा जिल्हा देशात दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे कर्नल दीनेश कुमार झा यांनी सांगितले.

Alankar Group
अलंकार ग्रुपने केला 75 माजी सैनिकांचा गौरव

By

Published : Aug 16, 2022, 10:14 PM IST

Updated : Aug 17, 2022, 10:33 AM IST

सातारा कराडमधील हॉटेल अलंकार ग्रुपने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 माजी सैनिकांचा गौरव करून शहीद जवान तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. अलंकार ग्रुपचे प्रमुख दीपक अरबुणे यांच्या हस्ते हॉटेलच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एनसीसी बटालियनचे कर्नल दीनेश कुमार झा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शहीदांचे स्मरण, माजी सैनिकांचा गौरवसंपुर्ण देशभर जल्लोषात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हॉटेल अलंकार ग्रुपने ध्वजारोहणासह माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या देशसेवेला सलाम केला. स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्यानंतर युध्दात तसेच सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या त्यागाचे स्मरण केले. देशसेवेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना ध्वजारोहणास आमंत्रित करून त्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करत कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद जवान आणि यांच्या योदानाची आपण कायम जाणीव ठेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञ राहण्याचे आवाहन दीपक अरबुणे यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कराडमधील अलंकार ग्रुपने केला 75 माजी सैनिकांचा गौरव

अलंकारच्या सन्मानाने माजी सैनिक भारावलेस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ध्वजारोहणासाठी आमंत्रित करून गौरव करण्यात आल्याने माजी सैनिक भारावून गेले. आपल्या सेवेचा गौरव करून अलंकार ग्रुपने व्यक्त केलेल्या कृतज्ञतेने आमच्या सेवेचे फलित झाल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली. विजय दिवस सोहळ्याबरोबरच कराडमधील सामाजिक कार्यासाठी हॉटेल अलंकर ग्रुपचे प्रमुख दीपक अरबुणे हे नेहमीच मदतीसाठी तत्पर असतात, अशा शब्दात माजी सैनिकांनी अलंकार ग्रुपचे कौतुक केले.

वीरपुत्र देणारा महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावरस्वातंत्र्यपुर्व काळात स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळात सीमेवर सैनिकांनी मोठा संघर्ष केला. सातार्‍याच्या भुमीने देशासाठी मोठे बलिदान दिले असून अजुनही देत आहे. सर्वाधिक शहीद जवान देणारा सातारा जिल्हा देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशाने आपल्याला खूप काही दिले आहे. आपण देखील देशासाठी काही तरी केले पाहिजे, अशा भावना कर्नल दीनेश कुमार झा यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचाFree ST Bus Service 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी मधून मोफत प्रवास

Last Updated : Aug 17, 2022, 10:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details