महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Gadkari on Palkhi Route : आळंदी-पंढरपूर पालखी मार्ग तीन महिन्यात पूर्ण करणार - नितीन गडकरी

बारा हजार कोटींचा आळंदी-पंढरपूर हा पालखी मार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. काम पूर्ण झाल्यानंतर या पालखी मार्गाचे उद्घाटन महाराष्ट्रातील साधुंसंताच्या हस्ते करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Union Minister Nitin Gadkari
नितीन गडकरी

By

Published : Jan 27, 2023, 8:28 PM IST

सातारा -बारा हजार कोटींचा आळंदी-पंढरपूर हा पालखी मार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. काम पूर्ण झाल्यानंतर या पालखी मार्गाचे उद्घाटन महाराष्ट्रातील साधुंसंताच्या हस्ते करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विकासकामांचे लोकार्पण -केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज फलटण येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात उंडवडी कडेपठार-बारामती-फलटण रस्ता चौपदरीकरण व कॉक्रिटीकरण, शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट रस्ता राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरणाचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण आणि लोणंद-सातारा रस्ता मजबुतीकरणाचे डिजिटल पध्दतीने लोकार्पण झाले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, शहाजी पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते.

औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार वाढेल -सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी सन 2014 पर्यंत 49.04 कि.मी. होती. आता ही लांबी 858 कि.मी. झाली आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर विविध सुविधांसह औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळेल. स्थलांतर कमी होईल.

कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करावी -पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. त्यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

भांडायच्या वेळी आवश्य भांडू -फलटण या ऐतिहसिक शहरात येऊन नितीन गडकरी यांनी आपल्या भविष्याची दारे उघडी करुन दिली आहेत. त्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी अटोकाट प्रयत्न केले. त्याला यश आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहोत. भांडायच्यावेळी आवश्य भांडू. पण, फलटण तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र रहावे, असे आवाहन अपेक्षा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

गडकरींशिवाय दिल्लीत नेता नाही -सध्या दिल्लीत महाराष्ट्राला नितीन गडकरी यांच्याशिवाय कोणीही नेता राहिलेला नाही. त्यांच्याकडे असलेली रांग ही पक्ष म्हणून कधीच लागलेली नसते. असा माणूस आपल्याकडे विकासाची कामे घेऊन आला आहे. फलटण शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग पास केले आहेत. त्यांच्यामुळे फलटण शहराचे रुपडे बदलायला फार वेळ लागणार नाही, असा विश्वास रामराजेंनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details