महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वागतासाठी बुके घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी खडसावले - आरोग्य मंत्री राजेश टोपे

सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार काल सातार्‍यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फुलांचे बुके घेऊन जमा झाले होते, हे बघून कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलेच खडसावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : May 29, 2021, 12:26 PM IST

कराड (सातारा) - जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सातार्‍यात आले होते. अजित पवार सातार्‍यात दाखल होताच बुके घेऊन आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची स्वागतासाठी झुंबड उडाली. कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना स्वागतासाठी बुके घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी खडसावले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेतांना

"अजितदादांनी बुके पण घेतला नाही, असे म्हणाल"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे हे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी (शुक्रवारी) सातार्‍यात दाखल झाले होते. दुपारी उपमुख्यमंत्री सातार्‍याच्या शासकीय विश्रामगृहावर आले. यावेळी अजित पवारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. सातारा जिल्हा रेड झोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले. "महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या सातारा जिल्ह्यात आहे. तुमचे राष्ट्रवादीवर, आमच्यावर प्रेम आहे. त्यावर दुमत नाही. पण, नियम पाळा ना. बुके नाही घेतला तर अजितदादांनी बुके पण घेतला नाही, असे म्हणाल", अशा शब्दांत अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.

हेही वाचा -गेल्या वर्षाची जीएसटीची २४ हजार कोटींची भरपाई तातडीने मिळावी - अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details