सातारा -आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने टाकलेले छापे निवडणुकीच्या तोंडावर इतरांना भीती दाखवण्यासाठी टाकले जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सरकारवरती केली. ते आज साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेला इच्छुक असलेल्या नेत्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
निवडणुकांच्या तोंडावरती भाजप सरकारची मुश्रीफ यांच्यावरती कारवाई - अजित पवार - Ajit Pawar meeting
ज्यांचे कारखाने, शिक्षण संस्था आहेत, त्यांना त्रास देऊन पक्षात घेण्यासाठी दबाव व भीती दाखवली जात आहे, असे म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीका केली.
अजित पवार
पवारांनी सांगितले, की ज्यांचे कारखाने, शिक्षण संस्था आहेत, त्यांना त्रास देऊन पक्षात घेण्यासाठी दबाव व भीती दाखवली जात आहे. त्यामुळे अशा कारवाया भाजप सरकार करत आहे. तसेच भाजपकडून अनेकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी कारस्थाने केली जात आहेत, असेही ते म्हणाले.
Last Updated : Jul 25, 2019, 11:28 PM IST