सातारा -मेडिकल कॉलेज लवकर सुरू व्हावे यासाठी साताऱ्यात मीटिंग घेतली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सातारा येथील मेडिकल कॉलेजच्या अनुषंगाने विश्रामगृहावर आयोजित बैठकीपूर्वी ते बोलत होते.
साताऱ्यातील शासकिय मेडिकल कॉलेजचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी येथे आलो आहे. मेडिकल कॉलेजचा आराखडा प्रवेश प्रक्रिया पदनिर्मिती, हॉस्टेलची उभारणी याबाबत चर्चा करून ते अंतिम करण्यासोबतच अर्थसंकल्पातून निधीची तरतूद किती करावी लागेल, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकित घेतली. राज्याच्या अर्थसंकल्पातून पहिल्या टप्प्यात सुमारे 80 ते 100 कोटी निधी उपलब्ध करण्यान्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सारंग पाटील आदी उपस्थित होते