सातारा - मी कडक बोलतो, रोखठोक बोलतो पण, स्पष्ट बोलतो. कुणाची दिशाभूल करणार नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असला धंदा या सत्ताधाऱ्यांनी चालवला असल्याचेही अजित पवार म्हणाले.
फलटणचे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ पिंपोडे गावात आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचं पुढे काय झालं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बुवाबाजीला मी तीव्र विरोध करतो. श्रद्धा असली पाहिजे, त्यात दुमत नाही; पण अंधश्रद्धा नको. श्रद्धेचं उत्तम उदाहरण म्हणजे वारकरी समाज. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - मोदींच्या सभेला दुचाकीवर पाच-पाच जण या, कोणी अडवल्यास माझं नाव सांगा; भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य